राष्ट्रभक्ती

राष्ट्रभक्ती म्हणजे काय?
👉 डॉ. एपीजे अब्दुल कलाम फार सुंदर सांगतात, तुमच्या जवळ देशासाठी किमान दहा मिनिटे तरी आहे का? अर्थात देशाची सेवा करून आपण आपल्या देशाला कुठेतरी विकसनशील, प्रगतिशील, धैर्यवान, शक्तिशाली, गौरवशाली.... बनविण्याकरिता जो काही त्याला वेळ देवू शकतो... त्या कार्याचं मोल... माझ्या शब्दात सांगायचे म्हणजे राष्ट्रभक्ती.
  दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगितेता म्हणतात-
माझा देशची माझे घर | देश दुःखी जणू माझे ची शरीर | त्यासाठी मी निरंतर | कष्टी होईल सांभाळाया ||
असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा  तेचं देशा विषययीच प्रेम म्हणजे राष्ट्रभक्ती... जसं आपण प्रतिज्ञा म्हणतो की ‘भारत माझा देश आहे' तर त्यातील ‘माझा' हा शब्द खूप महत्त्वपूर्ण आहे नाहीतर आपण त्या ठिकाणी ‘आपण आपला देश असं ही म्हटलं असत... पण माझं म्हटल की माझी गाडी, माझं बुक, माझी शाळा... माझं राष्ट्र असं म्हटलं कि खुप जवळीकता निर्माण होते, म्हणून देश सुद्धा माझा आहे आणि त्या देशातील प्रत्येक जबाबदारी पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे... ते कर्तव्य म्हणजे राष्ट्रभक्ती. 
    या भूमीवरी जन्मी आलो या भूमीची शपथ मला देशाच्या भल्याविना ना जगण्याचा हक्क मला.✍️✍️(अल्पश्या बुद्धीतून प्रयत्न)
             धन्यवाद 🙏
                         © प्रितम मदनराव जांभूळकर 

0 Comments